Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी बी. सी. ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिक ठाकूर यांची निवड झाली. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, श्रीधरशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, डी. बी. ठाकूर, कान्हाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, एमकेसीएलचे कोकण अध्यक्ष जयंत भगत, रजनी ठाकूर, पायलट प्राप्ती ठाकूर, प्रतीक ठाकूर, भारत श्रीधर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मयूर ठाकूर, प्रिया ठाकूर, राज ठाकूर, अमोघ ठाकूर यांच्यासह कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply