खारघर : रामप्रहर वृत्त
भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या प्रयत्नाने खारघरमधील उद्यानाची डागडुजी व हॉलीबॉल खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे. येथील कै. भजनसम्राट महादेव बुवा घरत ज्येष्ठ नागरिक उद्यानात असणारे हिरवेगार गवत मुलांनी हॉलीबॉल व फुटबॉल खेळून खराब केल. त्यामुळे भाजप नेते प्रभाकर घरत यांनी यासंदर्भात सिडको व महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. यामध्ये उद्यानाची डागडुजी व मुलांना हॉलीबॉल व फुटबॉल खेळण्यासाठी नवीन मैदान तयार करण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत कै. भजनसम्राट महादेव बुवा घरत ज्येष्ठ नागरिक उद्यानात गवत लावण्यात आले व खारघर सेक्टर 4 येथील बेलपाडा गाव देवी मैदानात मुलांना हॉलीबॉल खेळाचे मैदान तयार करून देण्यात आले. या कामी भाजप नेते प्रभाकर यांच्यासह भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी हातभार लावला.