Breaking News

महिलांना स्वयंरोजगारासाठी वस्तूंचे होणार उद्या वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वन्यजीव विभाग ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्य अंतर्गत ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोणमार्फत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत शिरढोण व चिंचवण गावातील महिलांना स्वयंरोजगारसाठी शुक्रवारी (दि. 18) विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी 144 महिलांना शिलाई मशीन (सिंगर कंपनीची फुल शटल मशीन), 78 महिलांना पाणी तापवायचे गॅस गिझर (राकोल्ड कंपनीचे 6 लिटर), पाच युवक व युवतींना संगणक प्रशिक्षण आणि पाच युवकांना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण तसेच 279 महिलांना स्टीलचे कुकर वाटप शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक शिरढोण येथे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोणचे अध्यक्ष मंगेश रामचंद्र वाकडीकर, उपाध्यक्ष सुशांत वेदक, प्रितेश मुकादम, सदस्य शाम पवार, ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती चिंचवणचे ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती चिंचवण दत्तात्रेय हातमोडे, उपाध्यक्ष परेश ठोंबरे, शिरढोणचे सरपंच साधना कातकरी, उपसरपंच मोनाली घरत, सदस्य प्रमोद कर्णकर, विजय भोपी, गजानन घरत, भाऊ वाजेकर, संगीता चौधरी, रेश्मा वाजेकर, निकिता चौधरी, सानिका कातकरी, सुधाबाई माळी, सुवर्णा जगदीश पाटील आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply