Breaking News

पनवेलमध्ये आदिवासींना दाखले वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्याचा अमृत महोत्वसानिमित्त शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार पनवेल तहसील कार्यालयामार्फत कातकरी उत्थान अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील कल्हे येथे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 16) आदिवासी नागरिकांना दाखले वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील कल्हे गावातील समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, आदिवासी विकास निरीक्षक डी. पी. सुर्यवंशी, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष राजेंद्र मढवी, सदस्य नामदेव ठाकूर, कर्नाळा मंडळ अधिकारी मनोज मोरे, तलाठी विजय पाटील, प्रकाश लोढे, अर्चना ट्रस्टचे रत्नाकर घरत, राजेश पाटील, प्रकाश कोळी, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply