युवा अस्मिता संस्थेचा उपक्रम
पाली : प्रतिनिधी
युवा अस्मिता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंबी आदिवासीवाडीवर अन्नदान करून सोमवारी (दि. 14) व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा करण्यात आला.
फाउंडेशनचे संस्थापक कुणाल चव्हाण, संस्थेचे जिल्हा अध्यक्ष राज पाटील, कोकण विकास प्रबोधिनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुमुदिनी चव्हाण, सिद्धेश जगताप, अभिषेक शिंदे, कलावती दाबेकर, विशाल पेडामकर, ओंकार माळी, करण चव्हाण, विलास पवार, प्रसाद पवार आदींनी सोमवारी टेंबीवाडीमध्ये जाऊन तेथील गरीब, गरजू आदिवासींना अन्नदान केले.
फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 14 फेब्रुवारीला रोटी डे हा अनोखा उपक्रम राबवितो. गोरगरीब, गरजू लोकांना पोटभर जेवण देणे हा आमचा उद्देश आहे, असे कुणाल चव्हाण, रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तर हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवित असून त्याची व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असे राज पाटील यांनी सांगितले.