Breaking News

कामोठे येथे सफाई कामगारांना फेसशिल्ड आणि मास्कचे वाटप

कामोठे : रामप्रहर वृत्त – कामोठे मधील सेक्टर20 मधील नक्षत्र हौसिंग सोसायटीच्या वतीने स्व खर्चाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून  प्रभाग 11, 12 व 13 मध्ये 105 सफाई कामगारांना सोमवारी (दि. 8) फेसशिल्ड  आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

या वेळेस भारतीय जनता युवा मोर्चाचे कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष मयंक कुमार, तेजस जाधव तर नक्षत्र सोसायटीचे चेअरमन सुरेश पिल्लई, सेक्रेटरी अमूल्य नायक, खजिनदार सोमवीर, सचिन गावडे, अमित साळवे, रमेश एस, विनायक, शरद, रेंजीनी वी, प्रसन्ना एस, अनघा गावडे आणि किशोर आदी सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply