Breaking News

डॉ. मानस विश्वरूप यांचा पाली येथे सत्कार

पाली : रामप्रहर वृत्त

युवा गायक मानस विश्वरूप यांनी शास्त्रीय संगितामधे डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल त्यांचा ’सूर निरागस हो’ या संगितप्रेमी समूहाच्या वतीने पाली (ता. सुधागड) येथे सत्कार करण्यात आला.

पाली येथील कलानिधी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध शहनाईवादक पं. शैलेश भागवत, शास्त्रीय गायक राजाभाऊ शेंबेकर, बापुजी साठे आदी उपस्थित होते. या निमित्ताने समूहातील कलाकारांची सांगितिक मैफिल झाली.

ऋषिकेश अभ्यंकर, समृध्दी देवरुखकर, ओंकार इनामदार या उदयोन्मुख गायकांबरोबरच उत्सवमूर्ती डॉ. मानस विश्वरूप आणि राजाभाऊ शेंबेकर यांनी रागदारी, नाट्यपद, अभंग आदी गायनप्रकारांचे सादरीकरण केले. त्यांना संजय अवसरीकर व अशोक देव यानी संवादिनी तर धनंजय बेडेकर व सर्वेश गुरव यांनी तबलासाथ केली. समूहाचे संस्थापक किरण बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पं. शैलेश भागवत यांच्या शहनाईवादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रसिद्ध कीर्तनकार धनंजय गद्रे, चंद्रकांत मने, सतीश रानडे, महेश पेंडसे, मिलिंद काळेले, केदार जोशी, स्वराली गद्रे आदी सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply