उरण : रामप्रहर वृत्त
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 19) उरणमधील रानसई आदिवासीवाडीवर येथील बंधू-भगिनी व मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. निमित्त होते आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून आयोजित आदिवासी समाजासाठी दिवाळी साहित्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रमाचे.
या वेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, माझ्या मुंबईतील मतदारसंघात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी राहतात, मात्र आदिवासी बांधव निसर्गाचे जतन, संवर्धन, रक्षण करतात. त्यामुळे तेच खरे निसर्गाचे सेलिब्रिटी असून आज त्यांच्यासोबत रानसई येथे दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार उरण मतदारसंघातील आदिवासींची कुडाची घरे आता मॉडर्न आदिवासी व्हिलेज या संकल्पनेनुसार पक्की बांधून दिली जात आहेत. आदिवासी बांधवांच्या सगळ्या गरज आम्ही पूर्ण करू, असे आश्वासनही ना. शेलार यांनी दिले. या वेळी त्यांनी आदिवासींच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ केला.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, चंद्रकांत घरत, विद्याधर जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …
RamPrahar – The Panvel Daily Paper