Breaking News

नवीन पनवेलमधील आरोग्य शिबिरास प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

मोरे हेल्थकेअर आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 19)नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

नवीन पनवेल सेक्टर 14 येथील शिवतेज वृत्तपत्र वाचनालयात झालेल्या या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक  रत्नाकर पाटील,  कार्याध्यक्ष प्रेम कांबळे, सचिव नितीन रेवाळे, सांस्कृतिक अध्यक्ष समीर रेवाळे, प्रसिध्दीप्रमुख अक्षय वर्तक, मोरे हेल्थ केअरचे प्रशासकीय अधिकारी अनिल मखामले, नर्सिंग कर्मचारी  संघमित्रा हिवाळे, तसेच शिवतेजचे जेष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल केणी, कांतीलाल पाटील, संदेश पाटील, समीर शेणवईकर, चेतन मांजरेकर, सुमित कांबळे, प्रणित कांबळे, प्रथमेश रेवाळे, सुदेश पाटील, महिला मंडळाच्या सुनंदा पाटील, सुनिता पाटील, सुवर्णा पाटील, स्वाती रेवाळे, विमल पाटील, अनुष्का मांजरेकर, सुप्रिया कोळी, पार्वती खोत, ममता महाजन, जान्हवी रेवाळे, रिया कुळये, प्रिया महाजन, मानसी आमरे आदींनी मेहनत घेतली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply