मुंबई ः तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ना. आठवले म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात येऊन नेत्यांना भेटले. त्यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली तरी भाजपप्रणित एनडीएला काहीही फरक पडणार नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार आहे. केसीआर यांचे प्रभावक्षेत्र फक्त तेलंगणापुरतेच मर्यादित असून तिसर्या आघाडीसाठी त्यांनी राजकीय पुढाकार घेतल्याने काहीही फरक पडणार नाही.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …