कर्जत : बातमीदार
नेरळमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 3) ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यात सुरज साळवी यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तिथीप्रमाणे येत्या 31 मार्च रोजी साजर्या होणार्या नेरळमधील शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी गावातील मारुती मंदिरात बुधवारी समितीचे मावळते अध्यक्ष दर्शन मोडक यांनी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. त्यात अध्यक्ष म्हणून सुरज आप्पा साळवी, तर उपाध्यक्ष म्हणून तुषार रासम, ऋषीकेश राऊत, सचिव म्हणून प्रतीक भिसे, ऋषी साळुंखे आणि खजिनदार म्हणून कुणाल मनवे, केतन टेंभे यांची निवड करण्यात आली. विशाल साळुंखे, कौस्तुभ गावकर, अजिंक्य मनवे, यतीन यादव, विजय शिर्के, विश्वजित नाथ, देविदास गवळी यांच्यासह शिवप्रेमी नागरिक या वेळी उपस्थित होते.