Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दुर्गामातांचे दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवरात्रोत्सवाचा नववा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात झाला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवांना भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन अशीर्वाद घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड, वहाळ, कोपर, बामण डोंगरी, मोरावेमधील आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवांना सोमवारी भेट देऊन दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, रामजी बेरा, मनोज भुजबळ, निलेश बावीस्कर, नरगरसेविका नेत्रा पाटील, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य केतन घरत, अमित नाईक, महेश पाटील, साईचरण म्हात्रे, निर्गुण कवळे, राजू खारकर, नीलेश खारकर, धीरज ओवळेकर, भाजपचे उलवे नोड 1 अध्यक्ष मदन म्हात्रे, उलवे नोड 2 अध्यक्ष विजय घरत, भाजप नेते सुधीर ठाकूर, भाऊ भोईर, अनंता ठाकूर, काशिनाथ पाटील, नंदू ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply