Breaking News

बोरघाटात खासगी बस उलटून दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे  द्रुतगती महामार्गावर खोपोली  हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन  प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी राजस्थानकडे निघाला होता. बसमध्ये 15 प्रवासी होते. पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर खालापूर हद्दीतील आडोशी बोगद्यातून बस बाहेर पडताना चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्याकडेला पलटी झाली. या अपघातात सखाराम चौधरी (वय 35, रा. पुणे), पिंटू मूलाराम राठोड (वय 28, रा. पुणे) हे दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य 13 किरकोळ जखमी प्रवाशांना जागेवरच प्रथम उपचार देण्यात आले. अपघातानंतर महामार्ग वाहतूक पोलीस व खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरु केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply