Breaking News

शिक्षक पतपेढीत आरटीजीएस, एनईएफटी सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी

शिवजयंतीचे औचित्य साधत रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील मुख्यालयात शनिवारी आरटीजीएस आणि एनईएफटी  सुविधा सुरू करण्यात आल्या. याचा लाभ पतसंस्थेच्या सभासद ग्राहकांना होणार असून व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. एखाद्या सभासदाचा मुलगा, मुलगी शिक्षणासाठी परदेशी अथवा इतर ठिकाणी असेल किंवा सभासद व त्याचा नातेवाईक कोणत्याही शहरामध्ये वैद्यकीय उपचार घेत असेल तर तातडीने सभासदाच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. संस्थेच्या आरटीजीएस व एनईएफटीद्वारे खात्यामध्ये पैसे जमा करणे सभासदांना सोयीचे होणार आहे. सभासदांना घरबसल्या व्यवहार करता येणार आहेत. नजीकच्या काळात संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक  सभासदांचे बचत खाते उघडण्यात येणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील व कोकण विभागातील सभासदांना होणार आहे. शिक्षक पतपेढी भविष्यात अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकीक मिळवेल, असा विश्वास चेअरमन राजेश सुर्वे यांनी या वेळी व्यक्त केला. पॅनल प्रमुख नरेंद्र गुरव, संस्थेचे व्हाइस चेअरमन देवानंद गोगर, मानद सचिव विलास पाटील, जितेंद्र बोडके,  उमेश महाडेश्वर, वैभव पिंगळे, दीपक साळवी, बालाजी गुबनरे, अमोल केतकर, लिना पाटील, महेंद्र सातमकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply