Breaking News

ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा भव्य गौरव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : प्रतिनिधी
आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे साधू संतांचा सत्कार झाला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. साधू- संतांच्या  सहवासात एक ऊर्जा मिळत असते. त्यांच्या सोबत थोडा जरी वेळ घालवला तर आपल्या आयुष्याचे भले होऊ शकते, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.
देव धर्म केल्याने आणि तुमच्या आशीर्वादामुळेच मुख्यमंत्री आणि  केंद्रीय मंत्री राहिलेल्या अंतुलेंचा मी पराभव करू शकलो, असेही ते म्हणाले. पनवेल भारतीय जनता पक्ष आयोजित ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा गौरव समारंभ खांदा कॉलनी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या गौरव समारंभ बुधवारी (दि. 1) रोजी सायंकाळी श्रीकृपा सभागृह खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी मंत्री संजय भेंगडे, आमदार प्रशांत ठाकुर, महेश बालदी, भाजप आध्यात्मिक सेल जिल्हा संयोजक काशीनाथ पारठे, उपमहापौर सिताताई पाटील, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, रत्नप्रभा घरत, वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, वर्षा माळी, नगरसेविका दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवाडे, रुचिता लोंढे, नगरसेवक एकनाठा गायकवाड, हरेश केणी, मनोहर म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे साधू- संतांचा सत्कार झाला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. ज्ञानेश्वर आणि तुकराम महाराजांची वाणी ते आपल्यापर्यंत पोहचवत असतात. अशा या  साधू-संतांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या वेळी त्यांचे हस्ते पद्माकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, आप्पा पांचाळ, गोविंद महाराज, सीताराम महाराज, बाळासाहेब लाड, चंद्रकला आई यांचेसह 163 ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा गौरव विठ्ठल- रखूमाईची मूर्ती, उपरणे व तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. कीर्तनकार व प्रवचनकारांनीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करून त्यांना अभिष्टचिंतन केले.

राम कृष्ण हरीने येथील वातावरण आज भारून गेले आहे. तुमच्यामुळे सकारात्मक ऊर्जा या परिसराला मिळते. पंतप्रधान पदाला ही आठ वर्ष पूर्ण होत असल्याने  ’आठ वर्ष सेवा पूर्ततेची, गरीब कल्याणाची’ असा उपक्रम भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. त्यात आज दुग्धशर्करा योग म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस. त्याच्या पूर्वसंध्येला आपल्यासारख्या सकारात्मक ऊर्जा देणार्‍या संतांचा सत्कार केला पाहिजे, या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
– आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र आणि देश ज्यांच्या आशीर्वादाने आणि विचाराने टिकला, हिंदुत्वाचे वेगळे नाते ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले त्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या सत्काराला येण्याची संधी मिळाली हे खर्‍या अर्थाने  माझे  भाग्य समजतो. अशा प्रकारचा सत्कार आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. आपणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगत्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येत आहेत. त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी आपल्याला निमंत्रण देतो .
– संजय भेंगडे, माजी राज्य मंत्री

या जगात देव कोणी पाहिला नाही, पण देव सांगणारे समोर बसलेत, याचा आनंद होत आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवसाच्या औचित्यामुळे हे साध्य झाले या बद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. वाढदिवस सगळेच साजरे करतात. दान द्यायचे ते सत्पात्री द्यायचे असते, आजचा आमचा कार्यक्रम सत्पात्री असल्याचा कार्यकर्ता म्हणून अभिमान वाटतो.
-आमदार महेश बालदी, उरण विधानसभा मतदारसंघ

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply