खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर रेल्वे स्टेशन बाहेरील भुयारी मार्गामधील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या खारघर मधील कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले आहे. घरत यांनी निवेदना म्हटले आहे की, खारघर रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गामधील रस्ता खराब झालेला आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी होते तसेच रिक्षा व दोन चाकी वाहनांची खड्ड्यांमुळे पडझड होत, परिणामी अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे येणार्या जाणार्या नागरिकांना त्रास होतो, म्हणून आपण तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा. जेणकरून तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही व वाहतूक कोंडीही होणार नाही. हे काम लवकरात लवकर करावे.