नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
तळोजा येथे उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली सुमारे 500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रिन्सिपल कमिशनर ऑफ कस्टम्स मुंबई यांच्या कार्यालयाने जप्त केलेले अमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि विदेशी मूळ सिगारेट जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती.
या अंतर्गत एकूण 343 किलो अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ ज्यात 293 किलो हेरॉईन आणि 50 किलो मेफ्रेडोन आहे. ज्याचे बाजारमूल्य अंदाजे 500 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर 19 मेट्रिक टन विदेशी सिगारेट ज्याची किंमत 15 कोटी आहे. या सगळ्याची विल्हेवाट कचरा व्यवस्थापन केंद्र तळोजा येथे लावण्यात आली. एनडीपीएस कायद्यानुसार अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ नष्ट करण्यात आले. उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली विल्हेवाट करण्यात आली. ज्यामध्ये डीआरआय आणि एनसीबी विभागातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मुंबई कस्टमचे प्रधान आयुक्त राजेश सनन यांनी दिली.