पनवेल : प्रतिनिधी
महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मंगळवारी (दि. 16) झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली.
अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सहाय्यक वाहतुक पोलीस अधीक्षक गणेश खांडेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, नगर रचना अधिकारी ज्योती कवाडे फेरीवाला समितीचे सदस्य, प्रभाग अधिकारी, पालिका अधिकारी
उपस्थित होते.
सिडकोकडून हस्तांतरीत होणार्या भूखंडावर फेरीवाला धोरण कशा पद्धतीने राबविण्यात येणार हे लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपायुक्त गणेश शेटे यांनी सांगितले. या वेळी फेरीवाला धोरणाबाबत समिती सदस्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. फेरीवाला धोरणाबाबत प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. गरज पडल्यास दर महिन्याला बैठक घेऊन फेरीवाला धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल व पुढच्या बैठकीत ना-फेरीवाला क्षेत्राबाबत निर्णय घेण्यात येईल असे ठरले.