पनवेल : बातमीदार
नवीन पनवेल सेक्टर 4मध्ये राहणारा प्रसनजीत बोस याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अंडर 14 ते 16 वर्ष वयोगटातील क्रिकेटपटूच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोर्समध्ये जीएसआर क्रिकेट अकादमीमध्ये प्रसनजीत बोस याने प्रथम क्रमांक पटकावला. नुकतीच त्याची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्याचे अभिनंदन होत आहे.