Breaking News

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : प्रतिनिधी

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्‍या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय अन्य 13 गाड्या पुण्यापर्यंत, तसेच पुण्यापासून पुढे धावणार आहेत. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे; तर ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रवाशांनी ब्लॉकच्या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

असे आहेत वाहतुकीतील बदल

पुणे-भुसावळ गाडी मनमाडमार्गे धावणार

पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द

नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार

कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी या तिन्ही गाड्या पुण्याहून सुटणार

पुणे-पनवेल-पुणे शटल सेवासुद्धा रद्द

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply