सचिनदादा यांना युरोपियन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
खालापूर : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस या संस्थेने शुक्रवारी (दि. 25) बँकॉक येथे लिविंग लिजेंड हा पुरस्कार देवून सन्मानित केले. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.
थोर निरुपणकार नानासाहेब धर्मधिकारी यांचे कार्य त्यांचे सुपुत्र पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्मधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरित्या करीत आहेत. आप्पासाहेब यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. शुक्रवारी बँकॉक येथे झालेल्या कार्यक्रमात युरोपियन युनिव्हर्सिटी पॅरिस या संस्थेने आप्पासाहेबांना लिविंग लिजेंड हा पुरस्कार तर सचिनदादा यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. हा सोहळा सुरू असताना रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात श्री सदस्यांसह व दास भक्तांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला. खोपोलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये फटाक्यांची आतिषबाजीमुळे झालेला कचरा श्री सदस्यांनी गोळा करून परीसर स्वच्छ केला.