Breaking News

महिला बॉक्सरचे लैंगिक शोषण; प्रशिक्षकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हरियाणाचे बॉक्सिंग कोच संदीप मलिक याने महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षकाला सोनीपत येथून अटक केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या संदीपने 19 वर्षीय खेळाडूचे लैंगिक शोषण केले. संदीपच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू पश्चिम बंगाल येथे क्लासिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी गेले होते. 29 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात ही स्पर्धा झाली. हरियाणाचा संघ 27 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतून दुरंतो एक्स्प्रेसने रवाना झाला. रेल्वे प्रवासादरम्यान आणि नंतर कोलकातामध्ये संदीपने महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केले.

संबंधित पीडित महिला बॉक्सरने खेळाडूने कोलकातामधून परत येताच दिल्ली रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संदीपवर गुन्हा दाखल केला आणि त्याला सोनीपत येथून अटक केली. अटक झाल्यानंतर चौकशीत संदीपने आरोप मान्य केला. संदीप विवाहीत असून, त्याला दोन मुले आहेत.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply