Monday , February 6 2023

मुंबईचे जुहू बीच जवानांनी केले चकाचक

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईच्या जुहू बीचवर ‘सीआयएसएफ’ व ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली. या स्वच्छता अभियानात मुंबईमधील ‘सीआयएसएफ’ युनिटचे 704 जवान व ‘सीआरपीएफ’चे 200  जवान सहभागी झाले होते. या सर्वांनी जुहू बीचची साफसफाई केली. ही मोहीम मुंबईच्या आयपीएस ‘सीआयएसएफ’च्या महानिरीक्षक मीनाक्षी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कार्यक्रमाला ‘सीआयएसएफ’ इकाई मुंबईचे वरिष्ठ अधिकारी व जवान उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply