Breaking News

कळंबोलीतील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण

कळंबोली : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र दिनाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना श्रीमती विद्या ठाकूर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वानपथक, बुलेटब्रुफ वाहन, आरआयव्ही वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरुण वाहन, अग्निशमन दल वाहन आदींनी संचलनाद्वारे प्रमुख अतिथी श्रीमती विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या वेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply