Breaking News

उरणमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

उरण : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त बुधवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरण तहसील प्रांगणात झाला. या वेळी आमदार मनोहर भोईर व उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी उपस्थित नागरिकांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी आमदार मनोहर भोईर, उरण तहसीलदार श्रीमती कल्पना गोडे, निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अतुल आहेर, पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे, निवडणूक नायब तहसीलदार आशा म्हात्रे, उरण उत्कर्ष समिती अध्यक्ष गोपाळ पाटील, सिव्हील डिफेन्सचे उपनियंत्रक राजेश्वरी कोरी, सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे, हासुराम भोईर, विलास पाटील, स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड, विना तलरेजा, ममता पाटील, सर्कल अधिकारी लक्ष्मण ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटोळे, अव्वल कारकून संदीप घरत, पत्रकार दिनेश पवार, कामठा येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण घरत, सामाजिक कार्यकर्ते राजेश फळसमकर, उरण ज्येष्ठ नागरिक संघाचे चिटणीस विजय सुळे, पालू भिंडे, चिंतामण गायकवाड, महेश वर्तक, तहसील कार्यालयातील कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply