मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यातच मुंबईच्या टीमने देखील अनोख्या प्रकारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या टीममधील जेसन बेहरनडॉर्फला मराठी शिकवून त्याला काही वाक्य बोलायला लावली आहेत. बेहरनडॉर्फला मुंबईकर सूर्यकुमार यादवने मराठीचे धडे दिले आहेत. मराठीचे धडे देतानाचा व्हिडीओ मुंबई टीमच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
माझ नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो. कसं काय पलटन? आणि लई भारी मुंबई, अशी तीन वाक्य बेहरनडॉर्फ मराठीतून बोलला आहे. हे वाक्य बोलताना बेहरनडॉर्फची चांगलीच तारांबळ पाहायला मिळाली. वरील वाक्य बोलल्यानंतर तो आपल्या कॅप्टन रोहित शर्माकडे गेला. बेहरनडॉर्फने रोहित सोबत मराठीतून संवाद साधला. सूर्यकुमारने शिकवलेल्या वाक्यांचा प्रयोग बेहरनडॉर्फने रोहितवर केला. कसं काय रोहित म्हणत बेहरनडॉर्फने त्याची विचारपूस केली. यावर रोहितने ‘मजेत’ असे उत्तर दिले. या उत्तरावर बेहरनडॉर्फ रोहितला ‘लई भारी’ म्हणाला.