Breaking News

नेरूळमध्ये मोफत मास्कवाटप

नवी मुंबई ः प्रतिनिधी :  कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर थैमान घातले आहे.  राज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत भीम महोत्सवचे प्रणेते राजगृह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक शरद (भाऊ) सरवदे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, या उदात्त हेतूने नेरूळमधील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे 500 मास्कचे वाटप केले.

नेरूळ सेक्टर 10  येथील कपिलवस्तु बुद्धविहार येथे राजगृह सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद सरवदे यांचा 45वा वाढदिवस नेरूळमधील कपिलवस्तु बुद्धविहारसह विविध बौद्ध सामाजिक व धार्मिक संघटनानी आयोजित केला होता. या वेळी शरद सरवदे यांनी कोरोनाची भीती बाळगू नका, मात्र काळजी घ्या, असे सांगत सुमारे 500 मास्कचे मोफत वाटप केले. वाढदिवस साध्या स्वरूपात साजरा करून सामाजिक हित जपणार्‍या सरवदे यांच्या कार्याचे दिलीप गायकवाड़, तानाजी मोरे, सुनील गाड़े, उत्तम कांबळे यांनी स्वागत केले आहे. या वेळी भीम महोत्सवचे प्रणेते शरद सरवदे यांच्या सामाजिक कार्याचे  उपस्थित मान्यवरांनी  आपल्या भाषणात कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply