Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात दोघांचा मृत्यू, 22 जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. 1) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये  दोन जणांचा मृत्यू, तर 22 जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा सहारा सिटी येथून लग्न मंडपाचे साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पो खंडाळा घाटात अंडा पॉइंटजवळ सुरक्षा कठडा तोडून खाली पडला. या वेळी टेम्पोच्या टपावर बसलेले 22 कामगार रस्त्यावर पडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. सर्व जखमींना खोपोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणण्यात आले. यातील गंभीर रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी पुढे हलविण्यात आले.
हरिश्चंंद्र बुदार असे मृताचे नाव असून जखमींमध्ये जयप्रकाश यादव, रवींद्र मोरे, प्रमोद बुधाप, कृष्णा आगपे, मंगेश काटकर, सचिन वीर, मंगेश पोरनाथ, मनोहर काटकर, विलास काटकर, अमित शिगवण, संजय सिंग, मंगेश बुधाप, योगेंद्र शहाणे, राजाराम वीर, राकेश तिवारी, विशाल जाधव, दीपक जाधव, प्रभाकर भोपीवले आदींचा समावेश आहे. यातील बहुतेक कामगार चिपळूणजवळील सावर्डे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. ते सर्व मुंबईतील नॅशनल डेकोरेटर्स या मंडपवाल्याकडे कामाला होते.
दुसरा अपघात खोपोली बायपास मार्गावर मिळ ठाकूरवाडीजवळ झाला. सामानाने भरलेला ट्रक रस्ता सोडून विद्युत खांबाला ठोकर मारून रस्त्याखाली खोल खड्ड्यात पडला. या अपघातात चालक राजेंद्र चव्हाण (वय 54, रा. विक्रोळी, मुंबई) याचा जागीच मृत्यू झाला. चालक चव्हाण स्वतः ट्रकचे मालक होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply