Breaking News

क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्त

बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला 87वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने बँकेच्या नवी मुंबई झोनने आपल्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी चार्जेर्स, रायगड सुपरकिंग्स, कोकण डेअरडेव्हिल्स अशा चार संघांचा सहभाग होता. स्पर्धेचे उद्घाटन बँकेचे कार्यकारी संचालक विजयकुमार यांच्या हस्ते झाले. साखळी सामने जिंकून नवी मुंबई वॉरिअर्स आणि वाशी चार्जेर्स या दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात वाशी संघाने आठ शतकांत 102 धावांचा डोंगर उभारून बलाढ्य असे लक्ष्य नवी मुंबई संघाला दिले. प्रत्युत्तरात नवी मुंबईचा कर्णधार अभिनव शर्मा यांनी तुफान फलंदाजी करून एकवेळ अशक्य वाटणारे 102 धावांचे लक्ष्य सात षटकांतच पूर्ण केले. अभिनव व सागर शिंदे यांनी मोठी भागीदारी करून अंतिम सामना सहज जिंकला. विजेत्या संघांसह सामनावीर उपझोनल मॅनेजर अमित सुतकर, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अभिनव शर्मा, उत्कृष्ट फलंदाज पूजन झा, उत्कृष्ट गोलंदाज दर्शन शिंदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशांत मोरे यांना गौरविण्यात आले. स्पर्धेस बँकेच्या महाप्रबंधक व झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविले. पारितोषिक वितरण त्यांच्याच हस्ते झाले. या वेळी उप अंचल प्रबंधक अमित सुतकर, सहाय्यक महाप्रबंधक पिंकी राणी, मुख्य प्रबंधक दिलीपकुमार उपाध्याय, मनीषा शर्मा, चंदन कुमार, रवी बालचंदानी उपस्थित होते. सामन्याचे धावते समालोचन सुतकर, अरविंद मोरे, उपाध्याय, पुनीत कपाथिया, झा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मोरे, सुशांत वर्मा, प्रसेनजीत अंकुश, ओंकार  शिंदे, व गोपीचंद पाटेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार मोरे यांनी केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply