मुरूड : प्रतिनिधी
भाजप हा जगातील सर्वांत मोठा व शक्तिशाली पक्ष आहे. जनतेला आता विश्वास पटला आहे की, भाजपच विकास करू शकतो. आगामी काळात भाजपशिवाय पर्याय असणार नाही, हे पक्के ठावूक असल्यानेच या पक्षात पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी (दि. 28) मुरूड येथे केले. मुरूड शहर व तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शहरातील शेगवाडा येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अॅड. मोहिते बोलत होते. कामाची चुणूक दाखवणार्या कार्यकर्त्यांची भाजपमध्ये कदर केली जाते, असे त्यांनी सांगितले. शैलेश काते यांनी प्रास्ताविकात भाजप राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी तालुका व शहर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यांना यावेळी अॅड. महेश मोहिते व ज्येष्ठ नेते जिल्हा कार्यकारिणी सदस्य जनार्दन कंधारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. या कार्यक्रमात शहरातील सक्रिय कार्यकर्ते परेश किल्लेकर, भाविका किल्लेकर यांच्यासह सुमारे 50 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे अॅड. मोहिते यांनी पक्षात स्वागत केले. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील आणखी काही कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही माजी नगरसेवकसुद्धा संपर्कात जनार्दन कंधारे यांनी यावेळी सांगितले. भाजपचे संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, सरचिटणीस नरेश वारगे, सुदाम वाघिलकर, महेश मानकर, बाळा भगत, सुनील खेऊर, गणेश कट, किशोर म्हसाळकर, सुधीर पाटील, गणेश गोगर, सुनील पाटील, शेषनाथ कानुगोजे, अमर सोडेकर, संजय जमादार, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष बबलू पांगारकर, हनिफ उलडे, नसिमा उलडे, सिमा कंधारे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा मंदा कासेकर, प्रतिभा गायकर, श्रद्धा गायकवाड, ज्योती भगत, रेश्मा म्हसाळकर, शुभांगी माळी, रिना राजपूरकर, यामिनी गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.