नवी मुंबई ः प्रतिनिधी
सिवूडस दारावे सेक्टर 27 येथील नैसर्गिक नाल्याची साफसफाई करून नाल्याच्या बाजूला जाळी बसवावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या नाल्याच्या परिसरात नागरी वसाहत आहे. येथील वंडर पार्कच्या मागून वाहत जाणार्या या नाल्यातील गाळ वर्षानुवर्षे काढलेला नाही. संरक्षणाच्या दृष्टीने हा धोकादायक असून जीवितहानी होऊ नये म्हणून या नाल्याच्या भोवती लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी रणजित नाईक यांनी मनपाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन नाईक यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडेही दिले आहे.