नाशिक : आमदार देवयानी फरांदे आणि महापौर सतीश कुलकर्णी यांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली. या वेळी आमदार आणि महापौरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वागत केले. नंदू काहार, स्वप्नील मोहरील, त्यागी आदी मान्यवर सोबत होते.
रत्नप्रभा घरत यांचा वाढदिवस
पनवेल : पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत यांनी शुभेच्छा दिल्या.
सनराईज न्यू इंग्लिश प्री-स्कूलचा प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम
सुकापूर (ता. पनवेल) : विश्वनाथ रघुनाथ भोपी एज्युकेशन सोसायटीच्या सनराईज न्यू इंग्लिश प्री-स्कूलचा प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, भाजप नेते पांडुरंग केणी आदी उपस्थित होते.