उरण : बातमीदार
मार्च 2021-2022, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आणि प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात झाला. या वेळी रयत टीकरिंग लॅबचे आमदार महेश बालदी यांनी उद्घाटन झाले.
प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने त्यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. दहागाव माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्यासह शिक्षक वृंद, सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी कृष्णा पाटील यांनी शाळेला झेरॉक्स मशीन भेट दिली. प्राचार्य व्हेटम यांच्या कार्यामुळे व त्यांनी शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली. कृष्णा पाटील यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.