Breaking News

कर्जतमध्ये अग्निशमन दलाकडून जनजागृती

कर्जत : बातमीदार

आग लागली की अग्निशमन दलाची मदत मागितली जाते. अग्निशामक उपकरणे कशी वापरावीत, आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, यासंबंधी कर्जत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने नुकताच शहरात ठिकठिकाणी मार्गदर्शन आणि जनजागृती केली तसेच  प्रात्यक्षिके दाखविली.

एखाद्या स्थळी अचानक लागलेली आग विझवण्यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे, या बाबत कर्जत नगर परिषद अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, दत्तात्रय म्हस्के, दिनेश हिरे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी शहरातील विविध भागात मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शहरात ठिकठिकाणी नागरिकांना प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले. ते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोलाचे ठरणार आहे.

-डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply