Breaking News

बीसीटी कॉलेजचा वार्षिक महोत्सव उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेज (बीसीटी)चा वार्षिक महोत्सव 10 ते 13 एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, अर्चना परेश ठाकूर, अ‍ॅड. विनायक कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, व्ही. सी. म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छ दिल्या.
कार्यक्रमापूर्वी कॉलेजमध्ये नव्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या बी.ए. एलएलबी कॉर्डिनेटर कक्ष, आयक्यूएसी कॉर्डिनेटर कक्ष, स्टाफ रूम, गर्ल्स कॉमन रूम आणि बॉय कॉमन रूमचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कॉलेजमध्ये आयोजित स्पोर्ट्स स्मॅश 2024 या वार्षिक क्रीडा महोत्सव व आगाज 2024 या दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात विविध सामने आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्षभरात विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनाही या वेळी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या सनवी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राघव शर्मा यांच्यासह इतर शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल म्हात्रे, प्रेरणा गायकवाड, अनामिका जोशी तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक राघव शर्मा यांनी केले.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply