महाड : प्रतिनिधी
लहान मुलांच्या आकाश पाळण्यात डोक्याचे केस अडकल्याने एक महिला गंभीर जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री महाडच्या छबिन्यात घडली. या महिलेला अधिक उपचारासाठी मुंबईत जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आकाश पाळण्यांच्या तांत्रिक तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पल्लवी सुरेश कोळवणकर (वय 30, रा. निजामपूर, ता. माणगांव) ही महिला आपल्या कुटुंबासह शुक्रवारी महाडमधील छबिन्यात आली होती. रात्री 11.50 वाजता मुलांना घेऊन ती पाळण्यात बसली होती. त्यावेळी पाळण्याच्या बेअरींगमध्ये तिच्या डोक्याचे केस अडकले. त्यामुळे केसांसह डोक्याच्या त्वचेचा मोठा भाग उपटून पल्लवी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने महाडमधील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पल्लवीला अधिक उपचारांसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले.
या दुर्घटनेला जबाबदार असलेला पाळणाचालक इंदल दयाराम चौहान (वय 30, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर भादवी कलम 337 व 338 अन्वये महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …