लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘निर्मिती फॅशन शो 2022’चे आयोजन करण्यात आले होते. सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या फॅशन शोचे मिसेस इंडीया लेगेसी 2021 च्या हर्षला तांबोळी यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषक वितरण समारंभ झाला.
निर्मिती फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी मोहेंजेदडो, चीन, कॉकटेल, इजिप्त, हवाईयन, सकारात्मक-नकारात्मक, काऊबॉय, कॅमोफ्लेज, निओप्लेटस या नऊ थिमचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मिसेस इंडिया लेगेसी 2021 च्या हर्षला योगेश तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर ज्युरी सदस्य म्हणून दिव्यांगना देसाई-लघाटे, फॅशन डिझायनर प्रोपिटर अॅल्युअर फॅशन स्टुडिओच्या भक्ती गोरे, विभागप्रमुख वंदना देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थी आपल्या विविध कलागुणे सादर करत उपस्थितांनी मने जिंकली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील यांच्या शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.