पनवेल ः रामप्रहर वृत्त
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिले आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26करिता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र महेश साळुंखे यांनी दिले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper