Breaking News

वाइन शॉपसमोर मद्यपींच्या रांगा

रोह्यात गर्दी हटविण्यासाठी पोलीस सरसावले

रोहे : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5) दारुची दुकाने उघडल्याने मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. रोह्यात गर्दीला शिस्त लावण्यासाठी पोलीस तसेच दारुबंदी विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेत तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यास सांगितले.

मद्यपी अनेक दिवस दारुची दुकाने कधी उघडणार याची आतुरतेने वाट बघत होते. अखेर राज्य सरकारने दारुची दुकाने उघडणार असे जाहीर करताच सोमवारी रोह्यात दारुच्या दुकानासमोर गर्दी झाली होती, मात्र दारु दुकानदारांना या संबंधी आदेश न आल्याने सोमवारी मद्यविक्रीची दुकाने बंद होती, परंतु मंगळवारी दारुची दुकाने उघडणार असल्याने सकाळी 8 वाजल्यापासून दारुच्या दुकानासमोर गर्दी होऊ लागली. दारुची दुकाने उघडल्यानंतर दुकानासमोर अक्षरश: रांग लागली.

दारुच्या दुकानासमोर मद्यपींची गर्दी वाढताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हे कर्मचार्‍यांना सोबत घेत दारुच्या दुकानासमोरील गर्दी कमी करण्यासाठी सरसावले. या वेळी दारुबंदी खात्याचे अधिकारीसुद्धा आले होते. त्यांनी दारुच्या दुकानासमोरील गर्दी कमी करून ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून लाईन लावण्यास सूचित केले.

मागील बरेच दिवस मद्याअभावी कोरडा पडलेला घसा ओला होणार असल्याने तळीरामांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. अनेकांनी रांग लावून दारु विकत घेतली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply