Breaking News

कनिष्ठ अभियंता रामदास तायडे आणि इतर कर्मचारी निलंबित

पनवेल : प्रतिनिधी

पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता  रामदास तायडे आणि इतर कर्मचार्‍यांनी  विभागातील सेवानिवृत कर्मचार्‍यांना निरोप देताना दारू पिऊन कार्यालयीन वेळेत पार्टी केलेल्या नृत्याबद्दल महापालिका आयुक्तांनी मंगळवारी निलंबनाचे आदेश काढले. त्यामुळे आता महापालिका कर्मचारी कार्यालयीन वेळेत कोणतेही गैरकृत्य करण्यास धजावणार नाहीत, अशी चर्चा महापालिका आवारात सुरू आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता रामदास तायडे, की-किपर दिलीप घोडेकर, अर्जुन गायकवाड, गुरुनाथ भगत, बाबू वांगारे, मनोहर गोंधळी यांनी आपल्या 31 मे रोजी निवृत्त झालेल्या सहकार्‍याना निरपो देताना कार्यालयीन वेळेत एसटी बस स्थानकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ दारू पिऊन नृत्य करतानाचा व्हडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आणि दैनिकात प्रसिद्ध झाल्याने महापालिकेची जनमानसात  प्रतिमा मलिन झाल्याने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याची दाखल घेतली. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार शासकीय कर्मचार्‍याला अशोभनीय ठरेल अशी वर्तणूक करून महापालिका अधिनियम कलम 56 नुसार वर्तणूक नियमाचा भंग केल्याबद्दल आयुक्तांना  मिळालेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी या कर्मचार्‍याना तत्काळ निलंबित केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply