Breaking News

खारघर येथे उद्या गुढीपाडवा उत्सव

पनवेल ः बातमीदार

 खारघर येथील मराठी फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शनिवारी (दि. 6)  गुढीपाडवा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुढीपाडवा  जल्लोष 2019 या पारंपरिक कार्यक्रमास अनेक नामांकित संस्थांनी आर्थिक पाठिंबा दिला आहे.

अपोलो हॉस्पिटल, निसर्ग निर्माण डेव्हलपर्स,

अ‍ॅरोहेड सर्व्हिसेस आणि कॉप्स सिक्युरिटी सर्व्हिसेस यांसारख्या संस्थांनी प्रायोजक म्हणून हातभार लावला आहे. खारघर येथील उद्योजक आणि बावर्ची रेस्टॉरंटचे मालक इम्तियाज शेख यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक म्हणून आघाडी

घेतली आहे. यावर्षी मराठी फाऊंडेशन खारघरद्वारा आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेच्या मिरवणुकीत समाजाला दान करू रक्ताचे, जतन करू पाण्याचे, संवर्धन करू वृक्षांचे, हा सामाजिक संदेश दिला जाणार आहे. उपरोक्त विषयांतर्गत चित्रकला स्पर्धा मुलांसाठी आणि खुल्या गटासाठी आयोजित केली आहे, तसेच सदर संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता बैलगाड्यांच्या चित्ररथांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी इतर स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. सर्वांत आकर्षक आणि उत्सवादरम्यान पवित्र अशी शंखवादन स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. शोभायात्रा सकाळी 7 वाजता गणेश मंदिर, सेक्टर 35 पासून सुरू होईल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply