खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथे नव्याने सुरू होणार्या के.के.वाघ इंटरनॅशनल स्कूलच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.18) झाले.
नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे मापदंड स्थापन केल्यानंतर के. के. वाघ शिक्षण संस्था आता के.के. वाघ इंटरनॅशनल स्कूल या आधुनिक आणि भव्य प्रकल्पाद्वारे पनवेल, नवी मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करीत आहे. खारघर सेक्टर 35 डी येथे संस्थेचे इंटरनॅशनल स्कूल सुरू होणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे भूमिपूजन झाले.
चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, चिपळूणचे आमदार शेखर निकम, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, विनोद घरत, महिला मोर्चाच्या साधना पवार, वासुदेव घरत, प्रभाकर जोशी, मन्सूर पटेल, मुख्य आर्किटेक्ट शेखर गंटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि के.के.वाघ शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …