Breaking News

करंजा येथील जंतुनाशक फवारणी चार दिवस सुरू राहणार

नगरसेवक कौशिक शहा यांची माहिती

उरण : वार्ताहर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगर परिषदेच्या वतीने करंजा येथे जंतुनाशक फवारणी सुरू आहे. ही फवारणी अजुनही शनिवारपर्यंत सुरु राहील जरुरी भासल्यास फवारणीचे काम रविवार पर्यंत सुरु राहील, अशी माहिती उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांनी दिली.

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील सुरकीचा पाडा, नवापाडा, कासवले पाडा व कोंढरी आदी ठिकाणी 98 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. उरण तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 105 वर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन उरण नगरपरिषद उरण यांच्या वतीने गेली चार दिवसापासून करंजा येथे जंतुनाशक फवारणीचे काम सुरु आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सुचनेनुसार उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी उरण नगरपरिषद कर्मचारी, आरोग्य निरीक्षक महेश लवटे व सफाई कामगार यांना करंजा गावात जंतुनाशक फवारणी  करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक फवारणी काम सुरु आहे. ही फवारणी गरज भासल्यास रविवार पर्यंत सुरु राहील, अशी माहिती नगरसेवक कौशिक शहा यांनी दिली. याकामी नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक रवी भोईर, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी व सर्व नगरसेवक, उरण नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे. तसेच या काळात  नागरिकांनी आपापल्या घरीच रहा व सुरक्षित राहा आपली काळजी घ्या, असे आवाहनही नगरसेवक कौशिक शाह यांनी नागरिकांना केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply