Breaking News

माणगावचा तिरंदाज श्री नागेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप नागे यांचा नातू व स्वप्नील संदीप नागे यांचा पुत्र श्री नागे याने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. त्यामुळे त्याची लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री नागे याने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत 10 वर्षाखालील गटात सुवर्णपदक, तर 14 वर्षाखालील गटात रौप्यपदक पटकाविले. या उज्ज्वल यशाबद्दल माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, एकता नगर रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन गव्हाणकर, माजी अध्यक्ष पुन्नू राठोड, दत्तनगर पूर्वचे अध्यक्ष नितीन राणे, नवनाथ गावडे आदींनी श्रीचा सत्कार करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply