मुरूड : प्रतिनिधी
मुदत संपलेल्या मुरूड-जंजिरा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करून तो मंगळवारी (दि. 8) रायगडच्या जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेचे कार्यलायीन प्रशासकिय अधिकारी परेश कुंभार यांनी दिली.
मुरूड-जंजिरा नगर परिषदेची मुदत संपली असून याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेची पूर्व तयारी म्हणून प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात प्रभाग संख्या, प्रभागनिहाय अनुसूचित जाती, जमाती यांची 2011 च्या लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशे यांचा समावेश आहे. मुरूड नगर परिषदेचा प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा मंगळवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला असून, त्यावर 10 ते 17 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यावर 22 मार्चला सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना 1 एप्रिला जाहीर करण्यात येणार आहे.
मुरुड नगर परिषद हद्दीतील लोकसंख्या 12 हजाराच्यावर असून येथे या पूर्वी 17 नगरसेवक होते ते आता 20 नगरसेवक होणार आहेत. नगराध्यक्षांची निवड आता नगरसेवकांमधून होेणार आहे.
-परेश कुंभार, प्रशासकिय अधिकारी, मुरूड नगर परिषद