Breaking News

अलिबाग पोलीस ठाण्याकडून महिलांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग पोलीस ठाण्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या सात महिलांचा मंगळवारी सत्कार करण्यात आला.

अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉ नीती भामरे, आरती साळुंखे, शकुंतला वाघमारे, दीप्ती पडवळ, श्वेता सणस, रुपाली पाटील, सारिका काटले या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे या कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. तनुश्री पेडणेकर यांनी केले. या वेळी महिला आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply