Breaking News

जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि पनवेल चेस असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आठ, बारा वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी कामोठे येथील इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पनवेल, उरण, पेण, खोपोली, कर्जतमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला.  स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष आल्हाद पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल चेस असोसिएशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर, सचिव सी. एन. पाटील, सदस्य अ‍ॅड. राजेश खंडागळे, इंडो स्कॉट ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. अजय श्रीवास्तव, ममता, किरण प्रधान, नेहा सिंग, स्पोर्ट्सचे प्रशांत यादव उपस्थित होते. पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमित कदम, संगणकाचे काम श्रेयस पाटील, राष्ट्रीय पंच सेच श्रेया पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी काम पाहिले. निवड झालेली आठ वर्षाखालील गटातील प्रत्येकी दोन मुले व मुली पुणे येथे 12 व 13 मार्च रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी, तर बारा वर्षाखालील गटातील दोन मुले व मुली नागपूर येथे 19 व 20 मार्च रोजी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेचा निकाल : आठ वर्षाखालील मुले-आरव राज (पनवेल) प्रथम, अद्वय ढेणे (पनवेल)  द्वितीय, आर. मुकील तृतीय, रेयान सिंग चतुर्थ. मुली-आरोही पाटील (उरण) प्रथम ,स्मिती शेडगे (उरण) द्वितीय, सानवी कुर्बेट्टी तृतीय; बारा वर्षाखालील मुले-ई. अभिषेक (पनवेल) प्रथम, श्राव्य गावंड (पनवेल) द्वितीय, शिवम श्रीवास्तव तृतीय, आरीव प्रभाकर चतुर्थ, अभिलाष यादव पंचम, मुली- ज्ञानदा गुजराथी (कर्जत) प्रथम, अनुष्का नेरकर (पनवेल) द्वितीय.सई इनामदार तृतीय, जस्विता चित्तुरी चतुर्थ.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply