Breaking News

महाड तहसील कार्यालयाला वॉटर कुलर भेट

महाड : प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरिता अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेने वॉटरकुलर भेट दिला आहे.

महापुरामध्ये महाडमधील विविध शासकीय कार्यालयांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयात  पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली होती. महाडमधील अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात वॉटरकुलर बसवण्यात आला. तहसीलदार सुरेश काशीद यांनी या वॉटरकुलरचे लोकार्पण केले. नायब तहसीलदार प्रदीप कुडळ, अरविंद घेमुड, मुफ्ती रफिक पुरकर, मुसद्दीक घोले, दिलदार पुरकर, खलील इसाने, मेहबूब कडवेकर, आदी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply