Breaking News

वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा : भारताच्या रवीला सुवर्णपदक

अल्माटी : वृत्तसंस्था

भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सलग दुसर्‍या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला 9-4 असे पराभूत केले. गतवर्षी रवीने जपानच्या युटो ताकेशिटाला नमवून सुवर्णपदक मिळवले होते. भारताने सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण 13 पदके जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जमा आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply