Breaking News

पोलादपूरमध्ये दिशा ग्रुपच्या स्पर्धेत श्रुती गोळे, प्रेमा मेस्त्री अव्वल

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील दिशा सांस्कृतिक ग्रुपतर्फे गुरूवारी सायंकाळी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रुती गोळे हिने मिस पोलादपूर तर प्रेमा मेस्त्री यांनी मिसेस पोलादपूर किताब पटकावला.

स्पर्धेच्या सुरूवातीस राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धेतील रॅम्पवॉकमध्ये सहभागी स्पर्धकांनी विविध आकर्षक पेहेरावांसह पदलालित्य दाखविले. मिस पोलादपूर स्पर्धेत चैताली राऊत फर्स्ट रनरअप आणि जान्हवी रेशीम सेकंड रनरअप राहिल्या. तर मिसेस पोलादपूर स्पर्धेत प्राजक्ता दळवी फर्स्ट रनरअप आणि पूजा खोत सेकंड रनरअप ठरल्या.

सारिका पालकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या परीक्षक मोनिका गोंधळी आणि पूनम जाधव तसेच माजी सरपंच वैशाली भुतकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रेक्षक महिलांसाठी अनेक फनी गेम्स आणि बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातील महिला कर्मचारी तसेच आशासेविका मनाली येरूणकर यांचा सत्कार करण्यात आला.

नगराध्यक्ष सोनल गायकवाड, महिला बालकल्याण सभापती अस्मिता पवार, नगरसेविका उज्ज्वला शेठ, स्नेहा मेहता, शिल्पा दरेकर, आशा गायकवाड, तेजश्री गरूड, अंकिता निकम जांभळेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिशा सांस्कृतिक गु्रपच्या संगीता मोरे, मंजुषा साबळे, सोनिया शेठ, योगिता भागवत, अदिती नगरकर, हर्षदा बोरकर, अर्पणा भागवत, स्वाती भागवत आणि श्रावणी शहा यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply